शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

व्हॉट्सअॅपवर नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 10:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने एका स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल 'व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनच्या प्रश्नावर मेंढ्यांच्या कळपाला उत्तर देताना दाखवण्यात आलं होतं''माझ्या धर्मामुळे करण्यात आलं टार्गेट'

मेरठ - पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने एका स्थानिक पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओ शेअर करणा-या पत्रकाराने सांगितलं आहे की, 'व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनच्या प्रश्नावर मेंढ्यांच्या कळपाला उत्तर देताना दाखवण्यात आलं होतं, आणि या मस्करीमुळे कोणाचं काही नुकसान झालं आहे असं मला वाटत नाही'. 

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस ठाण्याचे एसएचओ अंबरेश सिंह यांनी सांगितलं आहे की, 'अफगान सोनी नावाच्या व्यक्तीवर कलम 500 (बदनामी) आणि कलम 60 (कॉम्प्युटरशी संबंधित गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे'. एका हिंदी वृत्तपत्रासाठी काम करत असलेल्या पत्रकार अफगाण सोनी यांनी एसएसपी मंजिल सैनी यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ शेअर करताच, इतर सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि एसएसपींकडे यासंबंधी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मंजिल सैनी यांच्या आदेशानुसार अफगान सोनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ग्रुपमधील इतर सदस्यांना त्यासंबंधी माहिती पुरवण्यात आली आहे. 

'माझ्या धर्मामुळे करण्यात आलं टार्गेट'आपल्याविरोधात झालेल्या कारवाईवरुन आश्चर्य व्यक्त करत अफगाण सोनी यांनी सांगितलं आहे की, 'याआधीदेखील अनेकांनी एसएसपी यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपमानास्पद फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मला माझ्या धर्मामुळे टार्गेट करण्यात आलं आहे. मी चुकून तो व्हिडीओ शेअर केला होता. सोशल मीडियावर अनेकजण अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करत असतात, मग त्यांच्याविरोधात कारवाई का केली जात नाही'.

अफगान सोनी यांनी व्हिडीओ शेअर झाल्यानंतर ग्रुपमधील सदस्यांची माफी मागितली होती. आपण चुकून हा व्हिडीओ शेअर केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याच्या एक दिवसआधी तामिळनाडूमधील विरुधूनगर जिल्ह्यातील श्रीविलिपुथुर पोलिसांनी एका बेरोजगार तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी अपमानास्पद वक्तव्य केल्याने अटक केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाBJPभाजपाPoliceपोलिस