शहरातील वाहनचोरीची पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
By admin | Published: March 23, 2017 5:17 PM
नाशिक : शहरातील वाढत्या वाहनचोरीची पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीर दखल घेतली असून, दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या पोलीस ठाण्यांना मंगळवारी (दि़ २२) भेटी दिल्या़ तसेच चोरट्यांची वाहनचोरीची पद्धत तसेच त्यांच्या तपासाबाबत अधिकार्यांना सूचनाही केल्या़
नाशिक : शहरातील वाढत्या वाहनचोरीची पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीर दखल घेतली असून, दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या पोलीस ठाण्यांना मंगळवारी (दि़ २२) भेटी दिल्या़ तसेच चोरट्यांची वाहनचोरीची पद्धत तसेच त्यांच्या तपासाबाबत अधिकार्यांना सूचनाही केल्या़पोलीस आयुक्तालयातील गुन्ांमध्ये गत सहा महिन्यांमध्ये घट झाली आहे़ परंतु वाहनचोरीचे प्रमाण गतवर्षीइतकेच कायम आहे़ त्यामुळे पोलीस आयुक्त सिंगल यांनी गत दोन आठवड्यांमध्ये चोरीच्या घटना घडलेल्या भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांना अचानक भेट दिली़ त्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच बीट मार्शल यांना सूचना देत नाकाबंदीमध्ये वाहनांच्या कागदपत्रांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले़याबरोबरच पोलीस आयुक्तांनी शहरातील अपघाताच्या काही ठिकाणांना भेटी देऊन अपघाताची कारणे जाणून घेतली़ पोलीस आयुक्तांनी वाहन चोरीची दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)