फेसबुकवर मैत्रिणीसोबत पोलीस अश्लील भाषेत बोलायचा; शारिरीक संबंध ठेवण्यासाठी गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:35 AM2021-05-21T09:35:41+5:302021-05-21T09:38:28+5:30

मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. बरेच दिवस झाले तरी नवऱ्याचा फोन नाही आणि नवऱ्यासोबत बोलण न झालेने तिला संशय आला.

Police Constable Made Girlfriend On Facebook, Turned Out To Be Wife In Inodre | फेसबुकवर मैत्रिणीसोबत पोलीस अश्लील भाषेत बोलायचा; शारिरीक संबंध ठेवण्यासाठी गेला अन्...

फेसबुकवर मैत्रिणीसोबत पोलीस अश्लील भाषेत बोलायचा; शारिरीक संबंध ठेवण्यासाठी गेला अन्...

Next

नवी दिल्ली: पोलिसांच्या गुप्तचर शाखेचा अधिकारी त्याच्याच पत्नीच्या सापळ्यात अडकल्याची घटना मध्यप्रदेशमधील इंदौर शहरात घडली आहे. संबंधित पोलीसाने फेसबुकवर एका महिलेशी मैत्री केली आणि अश्लील भाषेत बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने त्या मैत्रिणीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी भेटायला बोलावले तर ती त्याचीच बायको निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

वास्तविक, संबंधित पोलीसाची पत्नी त्याच्यावर आधीपासूनच संशय घेत होती. त्यानंतर तीने सापळा रचत आपल्या पतीला पकडले. त्यानंतर त्याच्या पत्नीने डीआयजीकडे तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत ती म्हणाली की, अशा पतीसोबत आता मी राहू इच्छित नाही. तसेच त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे.

सुखलिया (सीजेआरएम) निवासी मनीषाच्या मते, आरोपी सत्यम बहल याच्याशी गेल्या वर्षी 22 फेब्रुवारी रोजी तिचे लग्न झाले होते. सत्यम स्पेशल ब्रांच (एसबी) मध्ये तैनात आहे. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर सत्यम आणि मनीषा यांच्यात वाद सुरू झाला. पैसे, कारची मागणी करुन सत्यमने तीला त्रास देणे सुरू केले.

सत्यम बहलने पोलीस असल्याची धमकी देऊन पत्नी मनीषाला मारहाण करण्यास सुरवात केली. अस्वस्थ होऊन मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. बरेच दिवस झाले तरी नवऱ्याचा फोन नाही आणि नवऱ्यासोबत बोलण न झालेने तिला संशय आला. मनीषाला संशयास्पद वाटलेनंतर तीने सत्यमबद्दल अधिक माहिती गोळा करण्यास सुरवात केली. त्यानंतर तिने एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट फेक आयडी तयार केला आणि सत्यमशी गप्पा मारण्यास सुरवात केली.

सत्यमने त्याचे प्रेम तिच्यासमोर मेसेजद्वारे व्यक्त केले, मग त्यानंतर आगळीक करून शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. मनीषा त्याला टाळत राहिली. जेव्हा सत्यमने भेटायला दबाव आणून जास्तच जबरदस्ती केली तेव्हा तिने त्याला खरी वस्तुस्थिती सांगितली. यानंतर 6 ऑगस्ट रोजी डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांच्याकडे स्क्रीन शॉट्ससह रीतसर नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. डीआयजीने पोलिस स्टेशनला त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

मनीषाच्या म्हणण्यानुसार, वडिलांनी लग्नात घरातील सर्व वस्तू, रुपये, दागिने आणि भेटवस्तू दिली होती. थोड्या दिवसांनंतर सत्यम आणि त्याची बहीण, सासू यांनी दुचाकी गाडी आणि पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. मनीषाचा फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर वर्तमानपत्र वाचण्यास, टीव्ही पाहण्यास बंदी घातली. 

कुटुंबातील सर्व सदस्य झोपल्यानंतरच तु झोपायचे असे आदेशही पतीने पत्नी मनीषाला दिले होते. तो म्हणत होता की तू माझी दासी आहेस. विरोध केल्यावर म्हणत असे की मी पोलिस आहे. मी तुझ्यावर खोट्या केसेस करून तुला अडचणीत टाकू शकतो. त्यानंतर अस्वस्थ होऊन मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. त्यानंतर काही दिवसांनी मनिषाची मावस बहिणीने सांगितले की, सत्यम मला घराबाहेर मला भेटायला बोलवत होता. यामुळे तीची शंका अधिकच वाढली आणि मनिषाने याबाबत शोध लावण्याचे ठरविले आणि पती जाळ्यात अडकला.

Web Title: Police Constable Made Girlfriend On Facebook, Turned Out To Be Wife In Inodre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.