पोलिसांना मारहाण प्रकरणी पोलीस कोठडी
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
पुणे : वाघेश्वर यात्रेदरम्यान कुस्ती बरोबरीत सोडल्याच्या कारणावरुन यात्रा कमिटी आणि पोलिसांना मारहाण करणा-या १३ जणांना शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कुलकर्णी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना गुरुवारी शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावामध्ये घडली होती.
पुणे : वाघेश्वर यात्रेदरम्यान कुस्ती बरोबरीत सोडल्याच्या कारणावरुन यात्रा कमिटी आणि पोलिसांना मारहाण करणा-या १३ जणांना शिरुर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कुलकर्णी यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना गुरुवारी शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावामध्ये घडली होती.बाळासाहेब कोळपे, भानुदास कोळपे, दादासाहेब कोळपे, रामभाऊ थोरात, बबन कोळपे, तात्याबा शेंडगे, सिदा शेंडगे, बाळासाहेब कोळपे, जगु कोळपे, बापु वाघमोडे, बाळु कारंडे, बिरा कोकरे, गणेश टेंगलेे, गणेश टेंगलेे, दादा कोळपे, भाऊसाहेब येळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल लडकत यांनी फिर्याद दिली आहे. लडकत आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोलते, कारंडे या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोंधळाप्रकरणी एकूण शुक्रवारी ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरकारी वकील निलेश लडकत यांनी आरोपींकडे अधिक तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करीत न्यायालयाने अरोपींना पोलीस कोठडी सुनावली.