नवी दिल्ली : रेल्वेतून मोठ्या प्रमाणात पोलिस विनातिकीट प्रवास करतात. दंड ठोठावल्यानंतर तो भरण्यास नकार दिलाच, शिवाय आम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही पोलिसांनी दिल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. सणासुदी व सुट्यांत विशेष तिकीट तपासणी मोहीम देशभर राबविण्यात येणार आहे. त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांसोबतच इतर प्रवाशांवरही कारवाई करण्यात येईल.
प्रवाशांनाही त्रास
उत्तर मध्य रेल्वे विभागाच्या तिकीट निरीक्षकांनी सांगितले की, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने विनातिकीट प्रवास करतात. तेच सर्वाधिक त्रास देतात. कारवाई केल्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करतात. खोटे प्रकरण दाखल करण्याची धमकीही देतात, असे रेल्वे तिकीट तपासनीस संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह म्हणाले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, विनातिकीट प्रवास कणाऱ्या शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांकडून आम्ही दंड वसूल केला. यावेळी प्रवाशांनीही साथ दिली. पोलिसांविरुद्ध कारवाई पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
३.६१ २४ कोटी लोकांना २०२३-२४ वर्षात विनातिकीट प्रवास करताना पकडले आहे.
२,२३१ कोटी रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे.