लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काल एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी लखनौ पोलिसांनी माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे पुत्र आलोक यांना ताब्यात घेतले आहे. आलोक हे काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या घटनेमागे काही कटकारस्थान असल्याचा पोलिसांचा दावा आहे.महाराजगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लखनौ पोलिसांना आलोक यांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर आलोक यांचे लोकेशन मिळाले होते. तसेच आलोक हे या महिलेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमधील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर काल एका महिलेने स्वत:वर ज्वलाग्राही पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी आग आटोक्यात आणत गंभीरपणे भाजलेल्या महिलेला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या महिलेची प्रकृती गंभीर आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला अंजना तिवारी ही उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील राहणारी आहे. तिचा विवाह अखिलेश तिवारी याच्याशी झाला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसांनंतरच या दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर या महिलेने धर्मपरिवर्तन करत आसिफ नावाच्या तरुणाशी विवाह केला होता. विवाहानंतर आसिफ रझा हा सौदी अरेबियाला निघून गेला. दरम्यान, आसिफचे कुटुंबीय आपल्याला सातत्याने त्रास देत असल्याचा जबाब या महिलेने दिले आहे. तसेच या जाचाला कंटाळून या महिलेने भाजपा कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते.महाराजगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नव्हती. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ इच्छित होती. मात्र तिची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे निराश होऊन या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते.
भाजपाच्या कार्यालयासमोर महिलेने केलेल्या आत्मदहनाप्रकरणी पोलिसांनी माजी राज्यपालांच्या मुलास घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 4:21 PM
Lucknow News : भाजपाच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काल एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठळक मुद्देलखनौमधील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर काल एका महिलेने स्वत:वर ज्वलाग्राही पदार्थ ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले होतेलखनौ पोलिसांनी माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे पुत्र आलोक यांना ताब्यात घेतले महाराजगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लखनौ पोलिसांना आलोक यांना ताब्यात घेतले