पोलिसांची डोकेदुखी वाढली कत्तलखान्याचा प्रश्न : झेंडीगेटमध्ये तणाव
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM
अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.
अहमदनगर : शहरामध्ये कत्तलखाना नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गायींची कत्तल होत असल्याच्या संशयावरून दर आठ ते पंधरा दिवसांनी शहरात तणाव निर्माण होत आहे. दोन समाजामध्ये वादावादीचे रुपांतर तणावात होत असल्याने पोलिसांनाही हातची कामे सोडून गायींमागे धावावे लागते आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीच मंगळवारी झेंडीगेट परिसरात दहा ते पंधरा गायी कत्तल करण्यासाठी आणल्याचा संशय निर्माण झाल्याने कुरेशी समाज आणि हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण तापले होते.मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जामखेड रोडमार्गे दहा ते पंधरा गायी असलेला एक टेम्पो झेंडीगेट भागातील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात घुसला. या टेम्पोतील गायी कत्तल करण्यासाठी आणल्याची माहिती हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे शंभरावर कार्यकर्ते झेंडीगेटमध्ये आले. तेथून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात मोर्चा वळविला. गायी सोडविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कोतवाली पोलिसांनी दहा ते पंधरा पोलिसांची कुमक झेंडीगेटकडे पाठविली. कार्यकर्ते आणि कुरेशी समाजातील खाटीक यांच्यात पोलिसांनी समेट घडवून आणल्याने वाद निवळला.नगर तालुका पोलिस ठाणे हे कुरेशी गल्लीमध्येच असले तरी या ठाण्यात पोलसांची कुमक कमी असल्याने त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती देऊन पोलीसबळ पाठविण्याची मागणी केली. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र गायी सोडविण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक भारत जाधव घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.-------------------महापालिका उदासीनशहराच्या बाहेर कत्तलखान्याची जागा शोधणे, अत्याधुनिक जागेवर बांधकाम करणे आणि शहराच्या काही भागात सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत काहीच हालचाली करीत नसल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराच्या बाहेर कत्तलखाना निर्मिती करण्याचा विषय दरवर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला जातो. मात्र प्रत्यक्षात त्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याने अनेक वर्षांपासून कत्तलखान्याचा विषय रखडलेला आहे.-------------वडगाव गुप्ता येथे जागाशहराबाहेरील वडगाव गुप्ता भागात महापालिकेचा जुना कोंडवाडा असलेल्या जागेत कत्तलखाना करण्याबाबतचा विषय स्थायी समितीमध्ये अनेकवेळा चर्चेला आला होता. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तसेच शहरातील अनधिकृत कत्तलखाना चालविणार्यांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने शहरात तेढ निर्माण झाली आहे.