भोपाळ : एखाद्या गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलीस काय युक्ती योजतील, हे सांगता येत नाही. खुनासह १६ गुन्ह्यांतील संशयित इसमाला अटक करण्यासाठी पोलिसांनी अटक करण्यासाठी गमतीदार सापळा रचला. तो संशयित विवाह करण्याच्या विचारात असल्याचे कळताच एका महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला.पोलीस ब-याच काळापासून बालकिशन चौबे नावाच्या गुन्हेगाराच्या शोधात होते. त्याची माहिती देणा-यास १० हजार रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले होते; पण तो हाती लागत नव्हता. त्याची माहिती मिळवताना पोलिसांना कळले की, बालकिशन चौबे विवाहाच्या तयारीत आहे आणि योग्य मुलीच्या शोधात आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांकही मिळविला.मोबाईल क्रमांक मिळवल्यानंतर आता महिला अधिकाºयामार्फत त्याच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवावा, असे ठरविण्यात आले. त्यासाठी पोलिसांनी मूळच्या बुंदेलखंडच्या व दिल्लीत मजुरी करणाºया एका महिलेचे सीम कार्ड काही काळासाठी ताब्यात घेतले. त्या क्रमांकावरून महिला पोलीस अधिकाºयाने त्याला कॉल केला. प्रत्यक्षात मात्र तुमचा क्रमांक चुकून लागला, असे तिने त्याला सांगितले.त्यामुळे बालकिशन चौबे याने तुम्ही कोण आहात, कुठे राहता, काय करता, अशी चौकशी फोनवरून सुरू केली. त्यानंतर तो महिला पोलीस अधिकाºयास वारंवार कॉल करू लागला. एक आठवडा असेच संभाषण सुरू राहिले.आठवड्यानंतर महिला पोलीस अधिका-याने तू माझ्याशी विवाह करणार का, करणार असशील तरच आपण बोलू, असे सांगितले. त्याने त्यास होकार दिला. (वृत्तसंस्था)साखरपुड्याला पोहोचला आणि...महोबा जिल्ह्यातील बिजौरी गावात आपण गुरुवारी साखरपुडा करायचा, असे त्या दोघांमध्ये ठरले. त्या गावातील मंदिरातच साखरपुडा करण्याचा निर्णय झाला. महिला पोलीस अधिकारीही साखरपुड्यासाठी सजून तिथे पोहोचली. अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारीही तिथे तिचे नातेवाईक म्हणून आले होते. बालकिशन चौबे त्या मंदिरात पोहोचताच पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. छतरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. एस. बघेल यांनीच ही माहिती दिली.
गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांचा ‘हनी ट्रॅप’; महिला पोलिसाने दाखविले लग्नाचे आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 6:17 AM