अटकेसाठी पाेलीस जीप रुग्णालयाच्या वाॅर्डमध्ये, अधिकाऱ्याला अटक, लैंगिक छळाचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:21 PM2024-05-24T12:21:59+5:302024-05-24T12:22:47+5:30
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पोलिसांची जीप गर्दी असलेल्या आपत्कालीन वॉर्डमधून जात असल्याचे दिसते. कार आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश करताच, सुरक्षा अधिकारी रुग्णांसह स्ट्रेचर बाजुला ढकलून जीपचा मार्ग मोकळा करताना दिसतात.
ऋषिकेश : महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांची गाडी रुग्णालयाच्या चाैथ्या मजल्यावर धडकली. हा प्रकार ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात घडला. गाडी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या २६ सेकंदांच्या या क्लिपमध्ये पोलिसांची जीप गर्दी असलेल्या आपत्कालीन वॉर्डमधून जात असल्याचे दिसते. कार आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश करताच, सुरक्षा अधिकारी रुग्णांसह स्ट्रेचर बाजुला ढकलून जीपचा मार्ग मोकळा करताना दिसतात.
एम्स ऋषिकेशचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार सिंह म्हणाले की, पोलिसांचे वाहन एम्सच्या आवारात कसे घुसले आणि बाहेर कसे गेले, याबद्दल आपल्याला माहिती नाही. तपासानंतर अधिक माहिती दिली जाईल. तर, एम्स चौकीचे प्रभारी विनेश कुमार यांनी एम्स सुरक्षा यंत्रणेने सांगितलेल्या मार्गानेच पोलिस तेथे गेले आणि आपत्कालीन वॉर्डमधून बाहेर पडले. मग काय समस्या आहे? असा सवाल केला.
ड्यूटीवर असताना विनयभंगाचा आराेप
- एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने ट्रॉमा सर्जरी युनिटमध्ये ड्यूटीवर असताना तिचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर नर्सिंग अधिकारी सतीश कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने तिला एक अश्लील एसएमएसदेखील पाठवला होता, असे ऋषिकेश पोलिस ठाण्याचे अधिकारी शंकर सिंह बिश्त यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
- नर्सिंग अधिकाऱ्याला निलंबनाऐवजी त्वरित काढून टाकण्याची मागणी संतप्त निवासी डॉक्टरांनी केली आहे. त्यांनी सोमवारी अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत घोषणाबाजी केली.