शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

जेएनयूमध्ये पोलिसांना बंदी

By admin | Published: February 23, 2016 3:36 AM

देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण

नवी दिल्ली : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने हे विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून दडून बसले होते. विद्यापीठ परिसरात वातावरण सुरळीत होत असल्यामुळे ते परतले. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक संघटनेला दिले आहे. पोलीस आतमध्ये गेलेले नाहीत. मात्र आरोपी विद्यार्थी निरपराध असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, निरपराध असल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी तपासात सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले आहे. त्या पाचही जणांना अटक करण्यासाठी पोलीस काल विद्यापीठापर्यंत पोहोचले. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आज सकाळपर्यंत पोलीस तिथेच होते. कुलगुरूंशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र आजही उशिरापर्यंत पोलीस विद्यापीठात गेले नव्हते.या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसल्यामुळे त्यांच्या बाजूने विद्यापीठाने भूमिका घ्यावी, पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात घुसू देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी सोमवारी सकाळी कुलगुरूंकडे केली होती.अतिरेकी नाही; पाकला गेलो नाहीकाल विद्यापीठात परतल्यानंतर उमर खालिदने म्हटले की, मी अतिरेकी नाही, गेल्या १० दिवसांत ज्या पद्धतीने माझी मीडिया ट्रायल झाली, त्यामुळे माझ्या कुटुंबावर काय बेतले, याची मला कल्पना आहे. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने मी पाकिस्तान वा अफगाणिस्तानात गेल्याचे वृत्त चुकीचे आहे. कार्यक्रमापूर्वी आखात वा काश्मीरमध्ये मी ८00 कॉल केल्याचा आरोपही खोटा आहे. अशी विधाने त्याने विद्यार्थ्यांसमोरील भाषणात केली. हे पाचही विद्यार्थी कालपासून प्रशासकीय कक्षात अन्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत बसले आहेत.विद्यापीठाने भूमिका घ्यावीविद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेने चौकशी समितीची पुनर्रचना केल्यानंतरच कामाला मुभा द्यावी. विद्यार्थ्यांनी या समितीसमक्ष हजर व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य वातावरण तयार करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे जेएनयूच्या शिक्षक संघटनेने (जेन्यूटा) तातडीने बोलाविलेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांवरील हे आरोप वगळण्याची भूमिका विद्यापीठाने घ्यावी असे आम्हाला वाटते, असे जेन्यूटाचे अध्यक्ष अजय पटनाईक यांनी म्हटले.पतियाळा हाउस कोर्टाच्या परिसरात पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यापुरती सुनावणी मर्यादित राहील. त्याबाबत १० मार्च रोजी सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. केवळ १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारापुरती सुनावणी सीमित असेल, असे जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष शेहला रशीद शोरा म्हणाली की, जादवपूर विद्यापीठ आणि एएमयूने पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करू दिला नव्हता; तशीच भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.