शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वंशाच्या दिव्यासाठी पत्नीसह चिमुरडींना लाथाडले संतापजनक : हतबल मातेची न्यायासाठी पोलीस ठाण्यात धाव

By admin | Published: August 05, 2016 10:25 PM

जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. या संतापजनक प्रकाराची माहिती झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनीही पोलीस ठाण्यात येऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली. या संतापजनक प्रकाराची माहिती झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनीही पोलीस ठाण्यात येऊन महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
आज सर्वत्र स्त्री-भ्रूणहत्या होऊ नये, कन्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याने लोकांची मानसिकतादेखील बदलत आहे. परंतु या सकारात्मक परिस्थितीत अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात माहेरी राहणार्‍या विवाहितेवर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. या विवाहितेचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुखाने सुरू होता. मात्र, विवाहितेच्या पोटी वर्षभरापूर्वी दोन कन्यांनी जन्म घेतला आणि तिच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. सासरच्या मंडळीने वंशाला दिवाच हवा म्हणून तिचा छळ केला. त्यात तिचा पतीही मागे राहिला नाही. त्याने दोन्ही मुली नको; मुलगाच हवा म्हणून या चिमुरडींना संपवण्याची भाषा केली. मात्र, मातेच्या हृदयाला हे कधीही पटणारे नव्हते. म्हणून या दाम्पत्यात खटके उडू लागले. शेवटी त्याने पत्नीसह दोन्ही चिमुरडींना तिच्या माहेरी पाठवून दिले.
मुलींचे संगोपन कसे करणार?
माहेरची परिस्थिती हलाकिची. त्यात स्वत:चे व मुलींचे संगोपन कसे करायचे? हा त्या विवाहितेसमोर मोठा प्रश्न आहे. या प्रकाराची माहिती झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी, मंगला बारी, संगीता गवळी, विमल वाणी, सुचित्रा महाजन, मनीषा पाटील यांनी त्या विवाहितेला सोबत घेऊन न्यायासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. विवाहितेने तिची संपूर्ण कहाणी सांगितली.