मेरठ : गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये जमावाने पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला आणि त्यांच्यावर जोरात दगडांचा मारा केला. सुबोध कुमार सिंह यांच्यावर आधी पाठीमागून कुºहाडीने वार करण्यात आले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, असे तपासात आढळून आले आहे.पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या प्रशांत नट यानेच जमावाला भडकावले होते आणि त्यानंतर जमावाने वाहनांना आगी लावण्यास सुरुवात केली. प्रशांत नट व त्याच्या चौघा साथीदारांना अटक झाली आहे. ते म्हणाले की, सुबोध कुमार सिंह यांच्यावर कलुआ नावाच्या आरोपीने सर्वात आधी कुºहाडीने हल्ला केला आणि तेथून तो लगेचच पळून गेला.संतप्त जमावाला शांत करण्याचे प्रयत्न सुबोध कुमार सिंह करीत असतानाच कलुआ याने आधी पाठीमागून कुºहाडीने वार केला. त्यात ते जखमी झाले आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यावर दगड फेकण्यात आले आणि नंतर गोळीही झाडण्यात आली, असे तपासात स्पष्ट झाले आहे, असे प्रभाकर चौधरी म्हणाले. जमाव दगडफेक करू लागल्याने जीव वाचविण्यासाठी सुबोध कुमार सिंह यांनीही एक गोळी झाडली होती. तीच अमित नावाच्या तरुणाला लागली. त्यात तो मरण पावला,आधी जवानाला झाली होती अटकजमावातील प्रशांत नट व आणखी काहींनी सुबोध कुमार सिंह जखमी होताच त्यांच्याकडील पिस्तूल हिसकावले. त्याच पिस्तुलातून प्रशांत नट याने गोळ्या झाडल्या, असेही विशेष तपास पथकाला आढळून आले असल्याचे प्रभाकर चौधरी यांनी नमूद केले. याआधी भारतीय लष्करातील एका रजेवर आलेल्या जवानाने सुबोध कुमार सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे काश्मीरमध्ये जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यामुळे त्या दंगलीत त्या जवानाचा नेमका काय सहभाग होता, हे स्पष्ट व्हायचे आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर कु-हाडीने वार करून झाडल्या होत्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 1:01 AM