वेतनाअभावी पोलीस कर्मचार्यांचे हाल
By admin | Published: May 21, 2016 11:48 PM
जळगाव: जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांचे दीड महिन्यापासून पगार झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्यांना संसाराचा गाडा हाकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार कर्मचारी आहे.तर अधिकार्यांची संख्या आणखी वेगळी आहे. राज्यात प्रत्येक जिल्ात कर्मचार्यांचे वेळेवर पगार होत असताना जिल्ातच विलंब का? असा प्रश्न कर्मचारी वर्ग विचारु लागला आहे. दरम्यान, विलंबामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्मचारी रोज संबंधित टेबलवर विचारणा करताना दिसून येत आहेत.
जळगाव: जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्यांचे दीड महिन्यापासून पगार झालेले नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचार्यांना संसाराचा गाडा हाकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार कर्मचारी आहे.तर अधिकार्यांची संख्या आणखी वेगळी आहे. राज्यात प्रत्येक जिल्ात कर्मचार्यांचे वेळेवर पगार होत असताना जिल्ातच विलंब का? असा प्रश्न कर्मचारी वर्ग विचारु लागला आहे. दरम्यान, विलंबामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्मचारी रोज संबंधित टेबलवर विचारणा करताना दिसून येत आहेत.पगाराबाबत लावली नोटीस पोलीस अधीक्षक कार्यालयात पगाराबाबत नोटीस लावण्यात आली आहे. १८ मे नंतरच पगार होतील, असे त्यात म्हटले आहे, मात्र आता २१ तारीख ओलांडली तरी पगार झालेले नाहीत. चार महिन्यापासून वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. वेतनाचे काम पाहण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आलेले असतानाही वेळेवर कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी सांगितले. पाच तारखेच्या आत पगार करावेत अशी मागणी होत आहे.शाळा प्रवेशाची घाईसध्या शाळा प्रवेशाची प्रक्रीया सुरु आहे, त्यामुळे प्रवेश घेण्यापासून दप्तर व पुस्तके खरेदीसाठी पैशांची नितांत गरज भासत आहे. पोलीस दलात अनेक कर्मचार्यांना वेतनाची आठवण येत नसली तरी बहुतांश कर्मचारी वेतनावरच अवलंबून आहेत.