गुवाहाटी : आसाममध्ये पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक झाली असून, याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या १९ झाली, असे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी सांगितले. ते म्हणाले, याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या कथित सहभागाबद्दल त्यांना पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केले जाईल. शस्त्रहीन उपनिरीक्षकासाठी ही भरतीची परीक्षा होती.
प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर प्रथमच घेतलेल्या पत्रकार परिषदेत महंता म्हणाले, ‘‘याप्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्यांना त्यांचे राजकीय स्थान किंवा पद यांचा विचार न करता अटक केली जाईल.’’ माजी पोलीस महानिरीक्षक पी. के. दत्ता आणि दिबान डेका या फरार लोकांना अटक करण्याच्या प्रयत्नांत आम्ही आहोत. यावेळी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी, गुवाहाटी पोलीस आणि आसाम पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते. त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागाची माहिती दिली.विरोधकांचा आरोपच्विरोधकांनी या प्रकरणात भाजपचा थेट सहभाग असल्याचा आरोप केला. सीआयडीने आतापर्यंत चार, गुवाहाटी पोलिसांच्या गुन्हा शाखेने नऊ, तर नलबारी जिल्हा पोलिसांनी सहा जणांना अटक केली.च्दोन मुख्य आरोपींबद्दल सांगताना अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) ग्यानेंद्र प्रतापसिंह म्हणाले, ‘‘दत्ता यांच्याविरुद्ध आम्ही लूक आऊट नोटीस बजावलेली असल्यामुळे ते देश सोडून जाऊ शकत नाहीत.’’च्दिबान डेका हे स्वत:ला भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असल्याचे फेसबुकवर सांगतात. ते गुरुवारी म्हणाले, ‘‘मी परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होतो व आता मी आसाम सोडले आहे. कारण या प्रकरणात आसाम पोलिसांचे अनेक भ्रष्ट व मोठे अधिकारी गुंतलेले असल्यामुळे मला ‘कोणत्याही क्षणी’ ठार मारले जाऊ शकते.’’