शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

चोरट्याने घातली पोलिसांच्या अंगावर दुचाकी चोरीच्या तीन दुचाकी जप्त : क्रमांक बदलवून गहाण ठेवल्या होत्या दुचाकी

By admin | Published: February 05, 2016 12:32 AM

जळगाव: पोलीस पकडण्यासाठी आल्याचे लक्षात येताच सचिन उर्फ नाना हरि धनगर (रा.धरणगाव ह.मु.गोपाळपुरा, जळगाव) या चोरट्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता नेरी नाका ट्रॅव्हल्स थांब्याजवळ पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेऊन पळण्याचा प्रयत्न केला. सिनेस्टाईल झटापटीत जिल्हा पेठ गुन्हे शाखेचे छगन तायडे व अल्ताफ पठाण या दोन कर्मचार्‍यांनी खरचटले आहे. दरम्यान, सचिन याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जळगाव: पोलीस पकडण्यासाठी आल्याचे लक्षात येताच सचिन उर्फ नाना हरि धनगर (रा.धरणगाव ह.मु.गोपाळपुरा, जळगाव) या चोरट्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता नेरी नाका ट्रॅव्हल्स थांब्याजवळ पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेऊन पळण्याचा प्रयत्न केला. सिनेस्टाईल झटापटीत जिल्हा पेठ गुन्हे शाखेचे छगन तायडे व अल्ताफ पठाण या दोन कर्मचार्‍यांनी खरचटले आहे. दरम्यान, सचिन याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पेठचे रवी नरवाडे, राजू मेंढे व छगन तायडे आदी जण रात्री पेट्रोलिंगला असताना गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता आकाश सूर्यवंशी (वय १९ रा.गोपाळपुरा, जळगाव) हा तरुण पेट्रोल चोरीच्या उद्देशाने सहा ते सात बाटल्या घेऊन फिरताना मानराज पार्कजवळ आढळून आला. त्याची या तिघांनी चौकशी केली असता त्याने पेट्रोल चोरीची कबुली दिली. यावेळी कर्मचार्‍यांनी पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर यांना घटनास्थळावर यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनीही लागलीच घटनास्थळी धाव घेतली. आकाशला त्याचा ठिकाणी विचारला असता मानराज पार्क परिसरात भाड्याच्या घरी त्याने पोलिसांना नेले. तेथे ड्रील मशीन, टॉमी आदी साहित्य मिळून आले. हे साहित्य मित्र नाना धनगर याने बांधकामावरुन चोरल्याची माहिती त्याने दिली.

दोन हजार रुपये घेवून बोलावले
आकाश याला ताब्यात घेतल्यानंतर नाना धनगरला ताब्यात घेण्यासाठी सकाळी साडे सात वाजता पोलिसांनी आकाशच्या माध्यमातून त्याला फोन करुन बोलावले. मला पोलिसांनी पकडले आहे, दोन हजार रुपये घेवून सोडून देणार आहेत, त्यासाठी तु पैसे घेवून नेरी नाक्यावर ये असा निरोप दिल्यानंतर नाना हा विना क्रमांकाच्या स्पार्टस् बाईकने तेथे आला. छगन तायडे यांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने त्यांना झटका मारुन दुचाकी फिरवली. ती दुचाकी त्याने अल्ताफ पठाण यांच्या अंगावर नेली. पठाण याने गचांडी धरल्याने तो दुचाकीसह खाली कोसळला. अन्य सहकारी राजू मेंढे व रवी नरवाडे यांनी त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणले.