देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान अंगावर काटा आणणारी एक भयंकर घटना घडली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एका 22 वर्षीय मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दिव्या असं हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. दिव्याच्या हत्येमागचं भयंकर कारण समोर आलं आहे. तिचं सौंदर्यच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या विशाखापट्टणममध्ये एका भाड्याच्या घरात राहत होती. घर मालकिणीने वेश्या व्यवसायासाठी तिचा छळ केला. तसेच केस आणि भुवया कापल्या, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला, तिला उपाशी ठेवलं. यामुळे दिव्याचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपासणी केली असता दिव्या सुंदर असल्याने वेश्या व्यवसायात ढकल्याचा आरोपींचा प्लॅन असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या घर मालकिणीला अटक करण्यात आली आहे. दिव्याला वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी अत्याचार केले आणि छळ करून तिची हत्या केली होती. पोलिसांना 22 वर्षीय मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला. जेव्हा आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत होते तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता दिव्याचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं कारण सुरुवातीला सांगण्यात आलं.
दिव्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता तिच्या शरीरावर 33 जखमा असल्याचं आढळून आलं. आरोपी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी दिव्याचा मृतदेह फुलांनी झाकला होता. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना वाहन चालकाला संशय आला आणि त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घर मालकीण दिव्याला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होती. तसेच ती सुंदर असल्याचाही राग तिच्या मनात होता. यावरूनच तिचा क्रूरपणे छळ करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"
CoronaVirus News : 'कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती आणखी बिघडतेय'; WHO ने दिला गंभीर इशारा
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात देशवासियांना मोठा दिलासा! 'ही' आकडेवारी पाहून म्हणाल अरे व्वा!
CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोना पसरतो का?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती
Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार