आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM
नेवासाफाटा : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन भिक्षेकरी महिलेचा खून करणारे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांनी दिली़ अक्षय शिवराम शिंदे व सागर शिवराम शिंदे अशी आरोपींची नावे आहेत़
नेवासाफाटा : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन भिक्षेकरी महिलेचा खून करणारे दोन्ही आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांनी दिली़ अक्षय शिवराम शिंदे व सागर शिवराम शिंदे अशी आरोपींची नावे आहेत़ अपघातात दुचाकीस्वार ठारनेवासाफाटा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील हंडीनिमगाव शिवारातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शनिवारी (दि़ २३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली़ यात राहुल नानासाहेब काकडे (वय २४, रा़ उस्थळ दुमाला) हा तरुण जागीच ठार झाला़ तो एम. एच. १७, ए. वाय. ९७१४ क्रमांकाच्या दुचाकीवरुन नगरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला़ नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे़ पिचडगावात आंबेडकरांना अभिवादननेवासाफाटा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे डॉ़ आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले़ यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप सरोदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कामटे, सरपंच भिमराव बनसोडे, उपसरपंच भाऊसाहेब शेजुळ, सूर्यकांत कामटे, मनोहर शेजुळ, चंद्रकांत टिळेकर, लक्ष्मण पेहरे, सुरेश साबळे, दत्तू हजारे, अंबादास गव्हाणे आदी उपस्थित होते.रास्ता रोकोचा इशारानेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील बर्हाणपूर ग्रामपंचायतीने एक महिन्यापूर्वी प्रस्ताव देऊनही अद्याप टँकर न मिळाल्याने २७ एप्रिल रोजी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. गणपत चव्हाण, ॲड.बाळासाहेब चव्हाण, अण्णासाहेब विखे, उपसरपंच शरद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सचिन चव्हाण, मनोहर हापसे, माजी सरपंच नवनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.टकले यांची तक्रारपाथर्डी : सुमारे दहा वर्षापूर्वी हत्राळ गावात दलित वस्ती सुधार योजनेतून बांधलेल्या टाकीचे उद्घाटन ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करून त्यांची दिशाभूल केल्याची तक्रार शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले यांनी केली आहे. तसेच २०१५-१६ च्या १४ व्या वित्त आयोगात त्याच टाकीवरून दलित वस्तीसाठी पाईपलाईन तयार करण्यात आली, त्याचे उद्घाटन आमदारांच्या अगोदर सरपंचाच्या हस्ते झाले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी आमदारांबरोबरच हत्राळ ग्रामस्थांचीसुद्धा दिशाभूल केली आहे.