नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिस दलात तब्बल ५० टक्के जागा रिक्त असून जागा रिक्त असण्याची राष्ट्रीय सरासरी २४ टक्के आहे. पोलिसांची एकूण मंजूर पदे ही २२ लाख ८० हजार ६९१ आहेत त्यापैकी ५ लाख ४९ हजार २५ (२४.०२ टक्के) रिक्त आहेत. उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी असून ३.६३ लाख पदे मंजूर असून १.८१ लाख पोलिस कर्मचाऱ्यांची पदे भरायची आहेत. ते अतिशय ‘वाईट राज्य’ मानले जाते. एनंतर कर्नाटकचे स्थान आहे. तेथे एकूण मंजूर पदांच्या ३५ टक्के जागा रिक्त आहेत. तिथे ३९ हजार २७६ जागा भरायच्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोलिस दलातील ३३ टक्के जागा रिक्त आहेत. राज्यात एक लाख एक हजार ४८२ पदे मंजूर असून ३३ हजार ६३० जागा भरायच्या आहेत. महाराष्ट्रात १५ हजार ९९ जागा रिक्त आहेत. मध्य प्रदेशात २२ हजार ७३६ जागा भरायच्या आहेत. हरियाणामध्ये ६१ हजार ६९१ मंजूर जागांपैकी १९ हजार ३०५ पदे रिक्त आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशातील सर्वच राज्यांमध्ये पोलिसांच्या जागा रिकाम्या
By admin | Published: April 03, 2017 5:02 AM