भुवनेश्वर : ओडिशामध्ये ‘मो सरकार’ (माझे सरकार) कार्यक्रमाची सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी जनतेसाठी काम करावे; अन्यथा कारवाईस तयार राहावे, असा इशारा दिला आहे.पटनायक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व ३६५ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांशी शनिवारी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मो सरकार’अंतर्गत मुख्यमंत्री पोलीस ठाण्यात जाणाऱ्या लोकांशी थेट बोलणार असून, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत. सरकारी रुग्णालयांतील रुग्णांबाबतही मुख्यमंत्री असेच करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाºयाने सांगितले की, ‘मो सरकार’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात आगळावेगळा आहे.
‘पोलिसांनो, जनतेसाठी काम करा अथवा कारवाईस तयार राहा’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 4:39 AM