लखनऊ: मॉलमधील दुकानातून तीन शर्ट चोरून पळणारा एक पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांच्या हाती लागला आहे. पोलीस शिपायानं मॉलमधील नवेकोरे शर्ट घालून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मॉलमधील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची धुलाई केली. त्यांनी या मारहाणीचा व्हिडीओदेखील तयार केला.उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत असलेल्या आदेश कुमारच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर मान खाली खालण्याची वेळ आली आहे. आदेश कुमार हुसेनगंजमधील व्ही मॉलमध्ये गेला होता. ट्रायल रुममध्ये जाऊन त्यानं एकावर एक तीन नवे शर्ट चढवले. त्यावर पोलिसी गणवेश परिधान केला. गणवेशाच्या खाली तीन नवे शर्ट लपवून आदेश कुमार मॉलमधून फळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र शर्टवर असलेल्या बारकोडमुळे मेटल डिटेक्टरवरील अलार्म वाजला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कुमारला पकडलं.गणवेशाच्या खाली तीन शर्ट घालून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदेश कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी शिपायाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कुमारला मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.२१ फेब्रुवारीला गोमतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात असलेला शिपाई आदेश कुमार हुसेनगंज येथील व्ही मार्ट शॉपिंग मॉलमध्ये गेला होता. त्यानं ट्रायल रुममध्ये जाऊन एकावर एक तीन शर्ट चढवले. त्यानंतर त्यावर गणवेश घालून मॉलबाहेर तो बाहेर निघण्याच्या तयारीत होता. प्रत्येक शर्टवर बारकोड असल्यानं कुमार मेटल डिटेक्टरमधून जात असताना अलार्म वाजला. मॉलच्या सुरक्षा रक्षकानं त्याची झडती घेतली. त्यावेळी त्यानं गणवेशावेळी तीन नवीन शर्ट लपवले असल्याचं उघडकीस आलं.
गणवेशाखाली ३ नवे शर्ट्स घालून पळत होता पोलीस शिपाई; मॉल कर्मचाऱ्यांनी केली धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:11 AM