पोलिसाच्या पत्नीची दहा तोळ्याची सोनसाखळी लांबवली
By admin | Published: March 05, 2016 11:47 PM
जळगाव: औरंगाबाद येथून जळगावात आलेल्या प्राजक्ता प्रदीप पाटील (रा. सोयगाव) या महिलेची शनिवारी दुपारी साडे चार वाजता नवीन बसस्थानकातून पर्स लांबवण्यात आली. त्यात दहा तोळ्याची सोनसाखळी व पाच हजार रुपये रोख असा चाळीस हजाराचा ऐवज लंपास झाला आहे. प्राजक्ता यांचे पती पी.डी.पाटील हे गडचिरोली येथे पोलीस खात्यात सेवेत आहेत. दरम्यान, झाल्याप्रकाराची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप प्राजक्ता पाटील यांनी केला आहे.
जळगाव: औरंगाबाद येथून जळगावात आलेल्या प्राजक्ता प्रदीप पाटील (रा. सोयगाव) या महिलेची शनिवारी दुपारी साडे चार वाजता नवीन बसस्थानकातून पर्स लांबवण्यात आली. त्यात दहा तोळ्याची सोनसाखळी व पाच हजार रुपये रोख असा चाळीस हजाराचा ऐवज लंपास झाला आहे. प्राजक्ता यांचे पती पी.डी.पाटील हे गडचिरोली येथे पोलीस खात्यात सेवेत आहेत. दरम्यान, झाल्याप्रकाराची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप प्राजक्ता पाटील यांनी केला आहे.गोरगावले ता.चोपडा येथे लग्न असल्याने प्राजक्ता पाटील व त्यांचे सासरे धनराज विठ्ठल पाटील हे शनिवारी दुपारी औरंगाबाद येथून बसने जळगावला आले. बसमधून उतरत असताना कोणीतरी त्यांच्याजवळी पर्स लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसस्थानकातील पोलीस कर्मचार्याला सांगितला. त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यावर तक्रार देवून उपयोग होणार नाही असे सांगून तक्रार घेण्यास नकार दिला. या प्रकाराची माहिती प्राजक्ता यांनी पती प्रदीप पाटील यांना दिली. दरम्यान, याबाबत आपण नियंत्रण कक्ष व पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला तरीही दखल घेतली गेली नाही, असे पाटील यांनी सांगितले.इन्फो...महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये प्रवाशाला मारहाणमहाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एस-७ या बोगीत दिनेश उमाकांत कुळकर्णी (वय ४१ रा.जळगाव) यांना चार ते पाच तरुणांनी शिरसोली दरम्यान बेदम मारहाण केली. कुळकर्णी हे पत्नी संगिता यांच्यासह मिरज येथे जात होते. त्यांचे आरक्षणही झाले होते. बोगीत सामानाचा धक्का लागल्याने त्यावरुन झालेल्या शाब्दीक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी आरपीएफ जवानांनी मध्यस्थी केली. पुढे पाचोरा स्टेशनवर त्या तरुणांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.