श्रीनगर : मुफ्ती मोहंमद सईद यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मिरातील भाजपा-पीडीपी आघाडी सरकार फुटीचे राजकारण करीत असल्याचा आरोप मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केला.जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या मुख्यालयी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये गत ३५ वर्षांपासून फारुख अब्दुल्लांचा दबदबा आहे. त्यांचा हा दबदबा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नाअंतर्गत त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने सोमवारी राज्याचे क्रीडामंत्री इमरान अन्सारी यांना या संघटनेच्या अध्यक्षपदी नेमले होते. मात्र जम्मूच्या एका न्यायालयाने यावर स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लोकांची पर्वा न करता विद्यमान सरकारने त्यांच्यात फूट पाडण्याचे धोरण अवलंबले आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
सरकारकडून फुटीचे राजकारण : अब्दुल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2015 10:26 PM