Political Donations: राजकीय देणग्या देण्यात 'या' कंपन्या आघाडीवर, भाजपला मिळाल्या सर्वाधिक देणग्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:25 PM2022-04-05T19:25:30+5:302022-04-05T19:26:26+5:30

Political Donations: कॉर्पोरेट जगताकडून राजकीय पक्षांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात. एका रिपोर्टनुसार, एकट्या भाजपला 78% देणग्या मिळाल्या आहेत.

Political Donations: BJP received the highest corporate donations of rs 720 crore in 2019-20 | Political Donations: राजकीय देणग्या देण्यात 'या' कंपन्या आघाडीवर, भाजपला मिळाल्या सर्वाधिक देणग्या

Political Donations: राजकीय देणग्या देण्यात 'या' कंपन्या आघाडीवर, भाजपला मिळाल्या सर्वाधिक देणग्या

googlenewsNext

नवी दिल्ली : राजकीय पक्षांचा खर्च पाहता एवढा पैसा कुठून येतो असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. वास्तविक, राजकीय पक्षांना कॉर्पोरेट जगताकडून दरवर्षी करोडो रुपयांच्या देणग्या मिळतात. सर्व मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या पक्षांना राजकीय देणग्या देतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देणगी देणाऱ्या कॉर्पोरेट्समध्ये काही अज्ञात नावांचाही समावेश आहे.

राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्या
राजकारणात पारदर्शकता ठेवण्यासाठी सक्रिय असलेल्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती ग्रुप (भारती एंटरप्रायझेस) आणि ITC सारखी मोठी नावे आहेत.

भारती ग्रुप आघाडीवर
एडीआरच्या अहवालानुसार, 'भारती एंटरप्रायझेसद्वारे समर्थित प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्यांमध्ये आघाडीवर आहे. 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना 247.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी ही ट्रस्ट 2016-17 आणि 2017-18 मध्येही देणग्या देण्यात आघाडीवर होती. या दोन वर्षांत, ट्रस्टने केवळ भाजप आणि काँग्रेस यांना 429.42 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यावेळी ते सत्य इलेक्टोरल ट्रस्ट म्हणून ओळखले जात होते. 2019-20 मध्येही या ट्रस्टने प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसला देणगी दिली आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने भाजपला 216.75 कोटी रुपये आणि काँग्रेसला 31 कोटी रुपये दिले आहेत.

या कंपन्या सर्वोच्च राजकीय देणगीदार होत्या
आयटीसी लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट, बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देणगीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

भाजपला 78 टक्के दान मिळाले
एडीआरच्या अहवालानुसार, केंद्रात सरकार चालवत असलेला भारतीय जनता पक्ष देणग्या मिळवण्यात आघाडीवर आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात टॉप-5 पक्षांना मिळून 921.95 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या मिळाल्या आणि त्यापैकी 720.40 कोटी रुपये एकट्या भाजपला मिळाले. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) आणि तृणमूल काँग्रेस (AITC) यांनाही देणग्या मिळाल्या आहेत. यावेळी सीपीआयला कोणतीही देणगी मिळालेली नाही. काँग्रेसला 133.4 कोटी आणि राष्ट्रवादीला 57.8 कोटी रुपये मिळाले आहेत.

Web Title: Political Donations: BJP received the highest corporate donations of rs 720 crore in 2019-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.