जयपूर:राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतकाँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे समोर येताच राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आमदारांची सायंकाळी 7 वाजता होणारी बैठक आता रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या 92 आमदारांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
हे आमदार काही वेळापूर्वी काँग्रेस आमदार शांती धारीवाल यांच्या घरी जमले होते. येथे या आमदारांकडून राजीनामे घेण्यात आले. आता हे राजीनामा सभापतींकडे सुपूर्द केले जाणार आहे. बैठक पार पडल्याचे काँग्रेस नेते प्रताप खाचरियावास यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निवडीत त्यांचे मत घेतले गेले नसल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अशोक गेहलोत यांना फोन करून परिस्थिती हाताळण्यास सांगितले, परंतु त्यांनी माज्या हातात काही नाही, असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत, अशा स्थितीत त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागत आहे. त्यांच्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेससाठी हा निर्णय तितकासा सोपा असणार नाही. गेहलोत गटाचे आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध करत आहेत.