शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

राजकारणातील दिग्गजांकडून लोकमतला कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 6:14 PM

दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला-वहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमतकडून पहिला-वहिला संसदीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्याच्या या पहिल्याच व ऐतिहासिक सोहळ्याचं राजकारणातल्या दिग्गज नेत्यांनी तोंडभरून कौतुक केलं. 
 
लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी गृहमंत्री शिवराज पाटील, केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी लोकमतचे आभार मानले.  संसदपटूंचा अशाप्रकारे सन्मान करणं खरंच कौतूकास्पद आहे. एखाद्या वृत्तपत्रसमुहाने खासदारांच्या सन्मानासाठी घेतलेला पुढाकार खरोखरंच उल्लेखनीय आहे असं म्हणत या सर्वांनी लोकमतला कौतुकाची थाप दिली. 

पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा-  युट्यूब,  फेसबुक , ट्विटर

 
खासदारांना संबोधित करताना नायडू म्हणाले, संसदपटूंचा सन्मान करण्याचा लोकमतने घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे, आजचा दिवस मोठा आहे . यावेळी खासदारांना संबोधित करताना नायडूंनी प्रतिस्पर्धी म्हणून काम करा शत्रू म्हणून नको, अखेर आपल्याला देशाचा विकास करायचा आहे हे लक्षात ठेवा असा धडा दिला. 
 
 

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला सुरूवात-

 दिल्लीच्या विज्ञान भवनात लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली आहे.भारतातील प्रसारमाध्यमांद्वारे संसद सदस्यांना राजधानीतविशेष पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  लोकमत वृत्तपत्र समूह यापुढे दरवर्षी संसदीय पुरस्कार देणार आहे. लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी प्रत्येकी ४ अशा ८ आदर्श सदस्यांचा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते लोकमत संसदीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. 

 
भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन.के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांना दिला जाईल. सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) व जया बच्चन (राज्यसभा) यांना दिला जाणार असून, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला जाणार आहे.
 
लोकमतच्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती अन्सारींव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी नगरविकासमंत्री व उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जया बच्चन हेसुद्धा उपस्थित आहेत. 
या ज्युरींनी केली निवड-
देशातील मान्यवर नेते, संसदेचे माजी सचिव व पत्रकारांच्या स्वतंत्र ज्युरी मंडळाला पुरस्कारयोग्य संसद सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी लोकमतने सोपवली होती. सुमारे ९ तासांच्या चर्चेनंतर ज्युरींनी ८ संसद सदस्यांची निवड केली. ज्युरी मंडळाचे अध्यक्षपद लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी भूषवले. ज्युरी मंडळामध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी, मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, शरद यादव, माजी लोकसभा सचिव सुभाष कश्यप, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, इंडिया टुडेचे राजकीय संपादक राजदीप सरदेसाई, लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व सदस्य सचिव पत्रकार हरीश गुप्ता यांचा समावेश होता.