बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी पुन्हा एकदा राजकीय पंडितांना तोंडघशी पाडले आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी जनमत चाचण्यांनी वर्तविलेले सर्व अंदाज या निकालांनी खोटे ठरवले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेची भविष्यवाणी करण्यात आली होती. भाजपा ९६ जागांसह क्रमांक एकचा पक्ष ठरेल व काँग्रेस पक्ष ९२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर 31 जागा मिळवून जनता दल किंगमेकर ठरेल, असे बहुतांश एक्झिट पोलचे म्हणणे होते. मात्र, आज निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा सहजपणे स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. केवळ टाइम्स–नाऊ टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 120 जागांवर विजय मिळेल, असे म्हटले होते. हा अंदाज जवळपास खरा ठरताना दिसत आहे. सध्या भाजपा 111 तर काँग्रेस 69 जागांवर आघाडीवर आहे. तर जनता दलालाही 40 जागांच्या आसपास समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश व बिहार निवडणुकीच्यावेळी एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते. गुजरात 2018मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्या व वृत्त संस्थांनी भाजपाला गुजरात निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं सांगतिलं होतं. पण मार्जिन नेमकं किती असेल याबद्दलची माहिती कुणालाही देता आली नाही. गुजरात निवडणुकीबद्दल टूडेज चाणक्यचा एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचा ठरला. गुजरातमध्ये भाजपाला 135 जागा मिळतिल असं टूडेज चाणक्यने एक्झिट पोल सांगितला होता. टाइम्स नाउ व्हिएमआरच्या एक्झिट पोलनूसार भाजपाला 115 जागा मिळतील तर काँग्रेसला 65 जागा मिळण्याचा अंदाज होता. रिपब्लिक-सी वोटर्स आणि न्यूज 18-सी वोटर्सनुसार भाजपाला 108 आणि काँग्रेसला 74 जागा मिळणार असं सांगितलं गेलं होतं. पण एक्झिट पोलचे हे नंबर काहीसे चुकीचे ठरले. गुजरातमध्ये भाजपाला 99 जागा मिळाल्या. 2012च्या निवडणुकीपेक्षा 16 जागा कमी मिळाल्या. पण गुजरातमध्ये सत्ता स्थापनेसाठी या जागा पुरेश्या होत्या. पण काँग्रेसने 2018मध्ये चांगली कामगिरी केली.
पंजाब 2017पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा दारूण पराभव होईल, असा अंदाज कुठल्याही एक्झिट पोलने वर्तविला नव्हता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये काँटेकी टक्कर होईल, असं विविध एक्झिट पोलने सांगितलं. पण हे सर्व अंदाज खोटे ठरले. इंडिया टीव्ही-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 67 पैकी 59 जागा जिंकत आप सत्ता स्थापन करेल,असं सांगण्यात आलं. न्यूड 24-चाणक्य आणि न्यूज एक्स-एमआरसीच्या एक्झिट पोलनुसार आप व काँग्रेसला समान जागा मिळतील. द इंडिया टूडे-अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 62-71 जागा देण्यात आल्या तर आपला 42-51 जागा देण्यात आल्या. एबीपी-सीएसडीसीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस मोठा पक्ष असल्याचा दावा होता. पण निकालानंतर एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले. पंजाबमध्ये आपला फक्त 20 जागा मिळाल्या.
उत्तर प्रदेश 2017उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भातील सगळे एक्झिट पोल भाजपाच्या बाजूचे होते. भाजपाचा विलक्षण विजय, काँग्रेस- सपाचं सपशेल अपयश कुणीही सांगितलं नाही. एबीपी-सीएसडीसी आणि इंडिया टीव्ही-सी वोटरने भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असण्याचा दावा केला होता. न्यूज 24- इंडिया चाणक्यचा एक्झिट पोल काहीसा बरोबर ठरला. भाजपाचा मोठा विजय असेल अस या एक्झिट पोलने म्हटलं होतं. 267-303 जागा मिळतील असा अंदाज होता. समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या युतीला 73-103 जागा मिळतील आणि बहुजन समाज पक्षाला 15-39 जागा मिळतील, असा अंदाज होता. निकालानंतर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय 403 जागांच्या विधानसभेत भाजपने 324 जागा आपल्या नावे केल्या.
बिहार 2015बिहार निवडणुकीचा निकाल सर्वांची उत्कंठा ताणणारा होता. एबीपी-नेन्सनच्या एक्झिट पोलने नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांच्या महायुतीला 130 जागा मिळतील तर भाजपाला 108 जागांवर समाधान मानावं लागेल, असा दावा केला होता. टाइम्स नाउ-सी वोटरने महायुतीला 122 जागा दिल्या होत्या तर भाजपाला 111 जागा मिळणार असल्याचा दावा केला होता. पण निकालानंतर एकही एक्झिट पोलचे आकडे निकालाच्या अगदी जवळचेही नसल्याचं सिद्ध झालं. बिहारमध्ये महायुतीचा 178 जागा मिळवत विजय झाला.