शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रस्त्याच्या कडेला राजकीय पक्षांचे बॅनर्स नको

By admin | Published: April 14, 2016 2:47 AM

रस्त्याच्या कडेला लागलेल्या राजकीय पक्षांच्या बॅनर्स आणि होर्डिंग्जमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असून त्याबद्दल कोणती कारवाई केली याविषयी माहिती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक

चेन्नई : रस्त्याच्या कडेला लागलेल्या राजकीय पक्षांच्या बॅनर्स आणि होर्डिंग्जमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असून त्याबद्दल कोणती कारवाई केली याविषयी माहिती देण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला बुधवारी दिला आहे.राजकीय नेत्यांच्या सभास्थळी मुभा असल्यामुळे ते वगळता रस्त्याच्या कडेला बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. तामिळनाडूत १६ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असताना सत्ताधारी अण्णाद्रमुकने सभास्थानापर्यंत संपूर्ण मार्गावर दोन पाने हे निवडणूक चिन्ह असलेले होर्डिंग्ज लावले असल्याकडे ‘ट्रॅफिक’ रामास्वामी यांनी एका जनहित याचिकेत लक्ष वेधले होते. अण्णाद्रमुकची राजकीय मान्यता रद्द करण्याची विनंतीही त्यांनी केली. त्यावर मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्या. एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. निवडणूक अधिकाऱ्याने सभा घेण्याला परवानगी दिली होती, असा दावा सरकारने केला होता.(वृत्तसंस्था)सभास्थळी नव्हे, तर रस्त्याच्या कडेला होर्डिंग्ज लागले असल्याचे छायाचित्रांवरून दिसून येते, अशा पद्धतीने होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते काय? ठरत असल्यास सत्ताधारी पक्षावर कोणती कारवाई करण्यात आली, ते निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे, असे खंडपीठाने आदेशात म्हटले. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे.