राजकारण समजून घ्यायचंय? काँग्रेस-भाजपामध्ये इंटर्नशीपसाठी करा अप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 09:14 AM2018-05-08T09:14:12+5:302018-05-08T09:14:12+5:30
देशाच्या युवा पिढीला आता राजकीय पक्षांमध्ये इंटर्नशीप मिळू शकते.
नवी दिल्ली- देशाच्या युवा पिढीला आता राजकीय पक्षांमध्ये इंटर्नशीप मिळू शकते. राजकीय क्षेत्रात तरुणांचा वाढता प्रभाव आणि महत्त्वा पाहता राजकीय पक्षांकडून तरुणाईला जोडण्यासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. यासाठीचाच एकत्र प्रयत्न म्हणजे तरुणांना राजकीय पक्षांमध्ये इंटर्नशीप करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. सगळ्यात राजकीय पक्षांनी याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
खरंतर 30 वर्षापेक्षा कमी वयाचे तरुण सध्या सत्तेची पायरी बनत आहेत. 2019च्या निवडणुकीत 60 टक्क्यापेक्षा जास्त मतदार याच वयोगटातील असतील. याच गोष्टी विचारात घेऊन काँग्रेसने आपल्या पारंपरिक अंदाजात बदल करुन या वर्षी उन्हाळ्यात पहिल्यांदाच इंटर्नशीप प्रोग्रॅम सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थींनी ज्याचं वय 30 वर्षापेक्षा कमी आहे, अशा युनिटसाठी इंटर्नशीप प्रोगामची सुरूवात केली आहे. या इंटर्नशीप प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना पॉलिटिकल ट्रेण्ड, राजकीय पक्षांच्या तरुणाईकडून असलेल्या अपेक्षा, सोशल ट्रेण्ड व इतर महत्त्वाच्या गोष्टींवर रिसर्च केला जाईल. या इंटर्नशीप प्रोग्रॅममध्ये विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल तसंच त्यांचं रिसर्च पक्षाकडून गांभीर्याने घेतलं जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
काँग्रेस बरोबर भाजपायुमोच्या युनिटनेही विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप सुरु केली आहे. यामध्ये 100 तरुणांना पॉलिटिकल मॅनेजमेंटवर इंटर्नशीप करण्याची संधी मिळेल. सुत्रांच्या माहितीनुसार, दोन्हीही पक्ष वर्षातून दोन वेळा ही पॉलिसी राबवणार आहेत.