महेश खरे सुरत : गुजरातेत सध्या सर्वत्र एकच धूम आहे आणि ती म्हणजे काँग्रेस, भाजप आपल्याच नाराज नेत्यांचे मन वळविण्यात गुंतलेले आहेत. असंतुष्टांचे काय करायचे, याचीच त्यांच्यासमोर खरी समस्या आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यात ८९ जागांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर आहे. याच काळात राजकीय पक्षांचे असंतुष्ट नेते उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरलेले आहेत. दक्षिण गुजरातबाबत बोलायचे झाले, तर काँग्रेस व भाजपचे ५० पेक्षा अधिक बंडखोर नेते डोकेदुखी बनले आहेत. त्यांनी आपले अर्ज परत घेतले नाहीत, तर ते निवडणूक निकालांवरही परिणाम करतील.मॅरेथॉन बैठकांचे सत्रबडे नेते व उमेदवार असंतुष्टांबरोबर मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहेत. कामरेज मतदारसंघात काँग्रेसने नीलशभाई कुंभाणी यांचे मन वळवले व त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. मजुरा भागात काँग्रेस उमेदवार अशोक कोठारी हे कपडा व्यापारी आहेत; परंतु कपडा बाजारात त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. त्यामुळे कोठारी व त्यांचे समर्थक व्यापाºयांची मनधरणी करण्यात गुंतलेले आहेत.भाजपमध्ये अनेक बडे नेते नाराजभाजपने तिकीट नाकारल्यामुळे अनेक बडे नेते नाराज झाले आहेत. एक तर ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत किंवा नाराज होऊन कोपभवनात जाऊन बसलेले आहेत. या निवडणुकीत आयाराम-गयारामांचीही चलती आहे. पाटीदार मतांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्ष सक्रिय आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेलने आरक्षणाच्या काँग्रेसच्या फॉर्म्युल्याला मंजुरी दिली. यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे व भाजपने पाटीदार मतांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत.
राजकीय पक्ष गुंतले डॅमेज कंट्रोलमध्ये, आपापले घर वाचविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:07 AM