शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

बिहारमध्ये राजकारण तापले; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:29 AM

नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता राजदने फेटाळली

एस. पी. सिन्हापाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी करून नितीशकुमार सरकार स्थापन करणार असल्याचा तेजप्रताप यादव यांचा दावा राजदने फेटाळून लावला. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी तर म्हटले आहे की, राजदमध्ये नितीशकुमार यांच्यासाठी कोणतीही रिक्त जागा नाही. त्यांना राजदकडून कोणतीही खुर्ची मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जगदानंद सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. राजदकडे अशी कोणतीही खुर्ची नाही, ज्यावर त्यांना बसविले जाईल. त्यांनी जनादेश लुटला असला तरी सर्वसामान्य जनता व गरिबांबाबत त्यांचे विचार काय आहेत? राबडीदेवी यांच्या निवासस्थानी झालेली इफ्तार पार्टी राजकीय कार्यक्रम नव्हता. नितीशकुमार भाजपवर कोणता दबाव आणू पाहत आहेत, हे तेच जाणोत. 

राजकीय चर्चाइफ्तार पार्टीच्या वेळी राजकीय चर्चा झाली, असे सांगून लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांनी या भेटीबाबतची उत्सुकता वाढविली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते व आमचे सरकार येऊ शकते, असेही ते म्हणाले. तथापि, नितीशकुमार यांनी स्पष्ट केले की, तेजस्वी यादव यांच्या इफ्तार पार्टीतील माझ्या हजेरीचे राजकीय अर्थ काढू नयेत.

भाजपवर निशाणाभाजपवर निशाणा साधताना जगदानंद सिंह म्हणाले की, बाबू वीरकुंवर सिंह यांचा विजयोत्सव ज्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच भाजपच्या शासन काळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि ते बंधुत्त्वाच्या गोष्टी करीत आहेत. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव