संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी, हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी आणि दिल्ली MCD च्या 250 वॉर्डससाठी झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येताना दिसत आहे. हिमाचलमध्येही भाजप पुनरागमन करताना दिसत आहे. मात्र, येथे काँग्रेसच्या जागाही भाजपच्या जवळपासच आहेत. मात्र, या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत करिष्मा करण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या हाती एक्झिट पोलच्या निकालात केवळ निराशाच आली आहे. हिमाचलमध्ये तर हा पक्ष आपले खातेही उघडतानाही दिसत नाही.
या व्यतिरिक्त, दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र, अरविंद केजरीवालांचा जलवा दिसून येत आहे. यावेळी आम आदमी पक्ष भाजपचा 15 वर्षांचा एमसीडीचा किल्याला उद्ध्वस्त करताना दिसत आहे. तर जाणून घेऊयात, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे सर्व पोल्स एका क्लिकवर...
गुजरात निवडणूक एक्झिट पोलचे निकाल -
इंडिया टीवी एक्झिट पोलइंडिया टीव्ही एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 112 ते 121, काँग्रेसला 51 ते 61 आणि आम आदमी पक्षाला 4 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.
आजतक-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल -आजतक-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 129 ते 151 जागा, काँग्रेसला 16 ते 30 आणि आम आदमी पार्टीला 9 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी-सी व्होटर एक्झिट पोल -एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 128 ते 140, काँग्रेसला 31 ते 43 आणि आम आदमी पक्षाला 3 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज 24-टुडे चाणक्यचा एक्झिट पोल -न्यूज 24-टूडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला 150, काँग्रेसला 19 आणि आपला 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक टीवी-पी मार्क एक्झिट पोल -रिपब्लिक टीव्ही-पी मार्कनुसार गुजरातमध्ये भाजपला 128 ते 148, काँग्रेसला 30 ते 42 आणि आपला 2 ते 10 जागा मिळत आहेत.
टाइम्स नाऊ इटीजी एक्झिट पोल -टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलने राज्यात भाजपला 135 ते 145 जागा, काँग्रेसला 24 ते 34 आणि आप 6 ते 16 जागा दिल्या आहेत.
हिमाचल प्रदेश निवडणुकीचे एक्झिट पोल्स -
इंडिया टीवी-मॅटराइज एक्झिट पोल -इंडिया टीव्ही-मॅटराइज एक्झिट पोलमध्ये भाजपला 35 ते 40 जागा, काँग्रेसला 26 ते 31 आणि आम आदमी पक्षाला शून्य जागा मिळण्याचा अंदाज आहे.
आज तक अॅक्सिस माय इंडिया -आज तक अॅक्सिस माय इंडियानुसार भाजपला 24 ते 36 जागा, काँग्रेसला 30 ते 40 आणि आम आदमी पार्टीला शून्य जागा मिळत आहेत.
एबीपी सी व्होटर -एबीपी सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 33 ते 41, काँग्रेसला 24 ते 32 आणि आम आदमी पार्टीला शून्य जागा मिळत आहेत.
न्यूज 24-टुडे चाणक्य एक्झिट पोल -या एक्झिट पोलमध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेस आणि भाजपला समान म्हणजेच प्रत्येकी 33-33 जागा मिळताना दिसत आहेत. तर आपला शून्य जागा मिळताना दिसत आहेत.
टाइम्स नाऊ इटीजी एक्झिट पोल - टाइम्स नाऊ इटीजीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 34 ते 42, काँग्रेसला 24 ते 32 आणि आपला शून्य जागा मिळाल्याचं दिसत आहे.
रिपब्लिक टीवी-पी मार्क एक्झिट पोल -रिपब्लिक टीव्ही-पी मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 34 ते 39 जागा, काँग्रेसला 28 ते 33 आणि आपला शून्य एक जागा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
MCD एक्झिट पोल -आज तक-अॅक्सिस माय इंडिया -आज तक-अॅक्सिस माय इंडियानुसार, दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला 149 ते 171 जागा, भाजपला 69 ते 91 आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळू शकतात.
न्यूज एक्स-जन की बात -न्यूज एक्स-जन की बातच्या, एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला 159 ते 175, भाजपला 70 ते 92 आणि काँग्रेसला चार ते सात जागा मिळू शकतात.
टाइम्स नाऊ- ईटीजी -टाइम्स नाऊ- ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पार्टीला 146 ते 156 जागा, भाजपला 84 ते 94 आणि काँग्रेसला 6 ते 10 जागा मिळत आहेत.