ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दिल्ली, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल व केरळ वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आणि हे यश नरेंद्र मोदींच्या करीश्म्याचं मानलं गेलं. भाजपाचे सगळे नेते व कार्यकर्ते भाजपाचं सरकार अत्यंत चांगला कारभार करत असल्याचं सांगत आहेत, तर विरोधक वाढती असहिष्णूता, वाढलेला दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, रोजगाराची वानवा, अर्थव्यवस्थेची असमाधानकारक वाढ याकडे लक्ष वेधत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकमतच्या वाचकांना काय वाटतं, त्यांची मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. यामध्ये महागाई, विकास, भ्रष्टाचार, मंत्र्यांची कामगिरी, मोदींचा करीश्मा, जातीयवाद, असहिष्णूता, काश्मिर अशा अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला असून जनतेला खरोखर या सरकारबद्दल काय वाटतं हे समोर येणार आहे.
पुढील प्रश्नांसोबत दिलेले पर्याय निवडा आणि पोलमध्ये सहभागी व्हा.