शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दुसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:25 AM

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या.

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. १ कोटी ५४ लाख मतदार गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण १६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल.>अमरावती । रंगतदार लढतीची उत्सुकताअमरावती मतदारसंघात यावेळी मोठी रंगतदार लढत होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना राष्टÑवादी काँग्रेसने समर्थन दिलेल्या नवनीत राणा यांनी कवडे आव्हान दिले आहे. शेवटच्या टप्प्यात अडसुळांनी राणांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विकासाचे बोला, असे प्रत्युत्तर राणांनी दिले.>रेल्वेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्यअमरावती जिल्ह्यात अनेक रेल्वेगाड्यांना थांबा दिला. अमरावतीतील रेल्वे स्थानक निर्मितीसाठी प्रयत्न केले. विमानतळ, रेल्वे वॅगन कारखाना, भारत डायनॅमिक्स, शकुंतला रेल्वे, अचलपूरची फिनले मिल यासाठी प्रयत्न केले. संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झालो. जनतेचे मुद्दे संसदेत पोटतिडकीने मांडले. स्थिर सरकार आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पुन्हा निवडून देण्याचे आवाहन अडसूळ यांनी केले.>महिला सबलीकरण आणि युवकनवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या रहिवासाचा मुद्दा उपस्थित केला. अडसूळ बाहेरचे असून ते पीएच्या भरवशावर कारभार करतात, असा आरोप त्यांनी केला. अचलपूर जिल्हा निर्मिती करणार आणि मेळघाटातील तापी प्रकल्प होऊ देणार नाही, बेराजगारांचा प्रश्न, महिलांचे सबलीकरण यावर भर देणार. विकास काय असतो, याची प्रचिती अमरावती मतदारसंघाला देणार.हेही उमेदवार रिंगणातवंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे, बसपाचे अरुण वानखडे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाच्या नीलिमा भटकर, आरिपाचे विनोद गाडे, आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाचे नीलेश पाटील, बहुजन मुक्तीच्या पंचशीला मोहोड, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे, बहुजन मुक्ती मोर्चाचे संजय आठवले, अपक्ष राजू सोनोने, राजू जामनेकर, पंकज मेश्राम, प्रमोद मेश्राम, ज्ञानेश्वर मानकर, अंबादास वानखडे, राहुल मोहोड, विलास थोरात, प्रवीण सरोदे, मीनाक्षी करवाडे, राजू मानकर, अनिल जामनेकर, श्रीकांत रायबोले, विजय विल्हेकर.