उत्तराखंड, गाेव्यात उद्या मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 11:55 AM2022-02-13T11:55:11+5:302022-02-13T11:56:00+5:30
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी अशा स्टार प्रचारकांना पाचारण करावे लागले होते.
नवी दिल्ली : गाेवा आणि उत्तराखंडमधील सर्व जागा तसेच उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांमध्ये हाेणाऱ्या साेमवार १४ फेब्रुवारीला हाेणाऱ्या मतदानासाठी जाहीर प्रचाराची रणधुमाळी शनिवारी थांबली. गाेव्यात ४० जागांवर ३३२ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे ११ लाख मतदार त्यांचा फैसला करणार आहेत.
पश्चिम उत्तर प्रदेशातील ९ जिल्ह्यांमध्ये ५५ जागांसाठी मतदान हाेणार असून ५८४ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे २ काेटी मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. उत्तराखंडमध्ये ७० मतदारसंघ असून ६३२ उमेदवार रिंगणात आहेत. तर जवळपास ८१ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, स्मृती इराणी अशा स्टार प्रचारकांना पाचारण करावे लागले होते.