लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीत हवेचे प्रदूषण रविवारी पुन्हा एकदा वाढले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. ‘सेंटर कंट्रोल रुम फॉर एयर क्वालिटी मॅनेजमेंट’नुसार, आज दुपारी हवेतील पीएम (पार्टिकुलेट मॅटर) २.५ आणि पीएम १0 ची सघनता क्रमश: ४७८ आणि ७१३ होती. २४ तासांसाठी याच्याशी संबंधित सुरक्षा मानके ६0 आणि १00 आहेत. काही जागी दृश्यमानता १00 मीटरपेक्षा कमी होती. केंद्र सरकारच्या सफर अर्थात सिस्टिम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चने केलेल्या तपासणीतही प्रदूषण वाढल्याचे दिसून आले.
अमेरिकेहून येणारे विमान रद्द दिल्लीतील हवामान खराब असल्याचे कारण सांगत अमेरिकेतील यूनायटेड एअरलाइन्सने दिल्लीला येणारे विमान रद्द केले आहे. या एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्कहून दिल्लीला येणारे हे विमान हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे रद्द केले आहे.
जुनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिल्लीतील १0 वर्षे जुनी डिझेल आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल वाहने जप्त करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. रस्त्याच्या कडेला पार्किंग करणार्यांना रोखा, असे हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
३४ रेल्वेंना विलंब : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने या भागातील ३४ रेल्वे रद्द केल्या असून, २१ रेल्वेंच्या वेळेत बदल केला आहे आणि ८ रेल्वे रद्द केल्या आहेत.