- शीलेश शर्मानवी दिल्ली - दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना श्वासाचे आजार आहेत ते खूपच त्रासले आहेत.शहर धुक्यात वेढले गेले आहे. दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर घोषित केले गेले आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणाचा स्तर आणखी वाढेल व लोकांचा त्रासही, असे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मोदी सरकार व केजरीवाल सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसलेले नाही. त्यावर राजकारण मात्र जोरात सुरू आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रदूषणाचे मुख्य केंद्र पंजाब असून तेथे पिकाचे खुंट जाळले जात असल्याने त्याचा धूर दिल्लीकडे सरकतो व तोच प्रदूषणाचे मुख्य कारण बनले आहे, असा दावा केला. पंजाब सरकारचा दावा आहे की, आम्ही पिकाचे खुंट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात ७२ टक्के घट केली आहे. केंद्र मदत देत नसल्याने प्रदूषण १०० टक्के थांबवणे शक्य नाही.९३ टक्के मुले घेतात विषारी हवादिल्ली, बनारस, आग्रा, लखनौ, कानपूर ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून जाहीर झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करून काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, १५ वर्षांखालील वयाची ९३ टक्के मुले जगात विषारी हवा घेत आहेत.त्यापैकी २५ टक्के मुले भारतात आहेत. भारतात दरवर्षी १० लाख लोक या प्रदूषणामुळे मरण पावतात. जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांतील १४ भारतातील आहेत.
प्रदूषण : दिल्लीकरांवर मृत्यूची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:54 AM