गुडगाव - वाढते औद्योगिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमुळे भारतातील शहरी भागामधील प्रदूषणामध्ये वेगाने वाढ होत आहे. दरम्यान, गुरगाव हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या 62 शहरांमध्ये हवेची गुणवत्ता तपासली त्यामध्ये गुरगावमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्यासे समोर आले. रविवारी येथे एअर क्वालिटी इंडेक्स 321 एवढा मापण्यात आला. हवा प्रदूषणाची ही सर्वात धोकादायक पातळी मानली जाते. दिल्ली-एनसीआरमधील अन्य प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथेही हवेची पातळी खराब असल्याचे समोर आले आहे. एकीकडे अधिकाऱ्यांनी गुडगांवमधील हवा प्रदूषित होण्यामागे अरब द्विपकल्पात आलेले धुळीचे वादळ कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. मात्र जबाबदार प्राधिकरणांकडून ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लान (जीआरएपी) ची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा पर्यावरणवादी करत आहेत. सीपीसीबीच्या एअर लॅब डिव्हिजनचे माजी प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गुडगावला बसला आहे. गुडगाव दिल्लीच्या पश्चिमेस असल्याने आणि धुळीचे कण वायव्येकडून येत असल्याने गुडगावमधील हवा प्रदूषित झाली आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्येही आर्द्रतेचा स्तर जास्त आहे. त्यामुळे धुलीकण हवेतील ओलाव्याला चिकटत आहेत. आता जोपर्यंत मुसळधार पाऊस पडत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही. मात्र हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक घटकांकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही."
pollution : गुडगाव ठरले भारतातील सर्वात प्रदूषित शहर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 4:55 PM