लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीतील कुतुबमीनारमध्ये पूजेच्या अधिकारासंदर्भात सत्र न्यायालात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय सुरक्षित ठेवला आहे. याप्रकरणी ९ जून राेजी निर्णय देण्यात येणार आहे. न्यायालयाने दाेन्ही पक्षकारांना एका आठवड्यात संक्षिप्त अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
याचिकाकर्ते काेणत्या कायदेशीर अधिकारापासून वंचित आहेत का, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तसेच गेल्या ८०० वर्षांपासून तेथे देवता पूजेपासून वंचित आहेत, तर सध्या त्यांना तसेच राहू द्यावे, असे मत न्यायालयाने नाेंदविले. कुतुबमीनार २७ मंदिरांना ताेडून बनविण्यात आले हाेते असा दावा हिंदू पक्षकारांनी केला हाेता.