शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पूजा खेडकर आमच्यामुळे नाही, तिच्यामुळेच एवढी प्रसिद्ध झाली; वकिलाला युपीएससीचे कोर्टात जोरदार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 1:54 PM

Pooja Khedkar News: आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत.

बरखास्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आज हायकोर्टाने खेडकरच्या अटकेच्या संरक्षणाला पुन्हा आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. आता चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस पूजा खेडकरला अटक करू शकणार नाहीत.

आज झालेल्या सुनावणीत पूजा खेडकरच्या वकिलांनी खोटी साक्ष नोंदविल्याच्या अर्ज प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. पूजा खेडकर ही महाराष्ट्रातच राहत असल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले. सध्या हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये आहे. सगळ्या प्रसारमाध्यमांचे लक्ष तिच्यावर आहे. यामुळे ती प्रचंड दबावाखाली असल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. 

यावर दिल्ली पोलिसांच्या वकिलाने युक्तीवाद करताना तपास संस्थांवर कधी दबाव नसतो, असे म्हटले. तर युपीएससीच्या वकिलांनी पूजा खेडकर ही तिच्यामुळेच एवढ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असेल तर त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घ्यायला नको होती, असे म्हटले आहे. 

पूजा खेडकरविरोधात पोलिसांचे म्हणणे काय...२०२२ आणि २०२३ मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेत खेडकरने वेगवेगळे अपंगत्व प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र अहमदनगर, महाराष्ट्राच्या वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केले होते. यामुळे दिल्ली पोलिसांनी यापूर्वीही पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती, तसेच भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. दोषी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

यूपीएससीच्या या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यूपीएससीला तिच्या नावामध्ये कोणताही फेरफार किंवा चुकीची माहिती दिली नसल्याचा दावा तिने केला होता.  

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगHigh Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी