शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

पूनम आझाद ‘आप’मध्ये

By admin | Published: November 14, 2016 1:31 AM

भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम यांनी आम आदमी पार्टीत सामील होत गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या तर्कवितर्कांना विराम दिला.

नवी दिल्ली : भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम यांनी आम आदमी पार्टीत सामील होत गेल्या अनेक महिन्यांपासूनच्या तर्कवितर्कांना विराम दिला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यामुळेच मला भाजपची साथ सोडावी लागली, असा परखड आरोपही त्यांनी केला.दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत आपमध्ये सामील झालेल्या पूनम यांची पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल, असे ‘आप’ने स्पष्ट केले. ‘आप’मध्ये युवकांसाठी मला उज्ज्वल भवितव्य दिसते, असे पूनम आझाद यांनी सांगितले. तत्पूर्वी, पूनम यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. पूनम यांचे पक्षात स्वागत करताना सिसोदिया यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देण्यात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. ‘आप’चे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी यावेळी सांगितले की, पंजाब निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. चर्चा केल्यानंतर त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल.आम आदमी पार्टीत मला युवकांसाठी उज्ज्वल भवितव्य दिसते. अरुण जेटली यांच्यामुळेच मला भाजप सोडावा लागला. अनेकदा शब्द देऊन त्यांनी निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध माझे पती कीर्ती आझाद यांनी आवाज उठविल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले. पूनम यांनी भाजप दुटप्पी असल्याचा आरोपही केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)