जेव्हा एखादी गोष्ट करायची इच्छा मनात पक्की असते, तेव्हा कितीही अडथळे आले तरी आपण थांबत नाही. एका महिला अधिकाऱ्याची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. जिने अधिकारी होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा सामना केला आणि करून दाखवलं. पूनम गौतम असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. पूनम यांनी आपला प्रवास यूपीएससीच्या तयारीने सुरू केला. जेव्हा त्यांनी तयारी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या.
पूनम यांच्या मातृत्वावरच प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. एवढ्या लहान मुलीला कसं सोडू शकता. तुम्ही तिची काळजी घेऊ शकत नाही. तुम्ही या क्षेत्रात जात आहात. नकारात्मक लोकांनी सांगितले की, यूपी बोर्डातून शिकणाऱ्या पूनम यांना यश मिळणार नाही. अशा परिस्थितीत त्यांनी नकारात्मक लोकांपासून स्वतःला दूर केले आणि चांगल्या तयारीने परीक्षा दिली.
पूनम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने दिलेला पाठिंबा हा माझ्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक संदेश होता की मुलाची काळजी घेणे ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. पूनम यांनी त्यांची तयारी दिल्लीत राहून केली. तयारी करत असताना आपल्या मुलीची आठवण आल्यावर त्या खूप रडायच्या. पूनम यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या परीक्षेत तिसरा क्रमांक मिळविला आणि त्या SDM झाल्या.
पूनम यांनी जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. त्याच वेळी, सर्व प्रथम, आपल्या क्षमता ओळखा. तुमच्या परीक्षेचा अभ्यासक्रम तपासा, तुमच्यासाठी कोणती पुस्तके अधिक योग्य असतील हे नीट समजून घ्या. त्यानुसार रणनीती बनवा. तुमच्या रिफ्रेशमेंटची काळजी घ्या. शक्य तितकी रिवीजन करा असा सल्ला दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"