पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा कल हळूहळू स्पष्ट होत आहे. बॅलेट मशीन जशजशा उघडत आहेत आणि त्यातील मतदारांचा कौल जसजसा समोर ते आहे तसतसं महाआघाडीच्या गोटातील चिंता वाढत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीने स्पष्ट बहुमातचा आकडा पार करणारी आघाडी घेतली आहे. तर, महाआघाडीला 100 च्या आसपास जागांवर यश मिळाले आहे. मात्र, महाआघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे. बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून काँग्रेस नेत्यांना हा पराभव पचनी पडत नसल्याचे दिसून येते.
बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांची एकत्र मोट बांधत महाआघाडी उभी करून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर आव्हान उभे केले होते. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 तर डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढवत होते. आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये 144 जागा लढवणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला 65 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर 29 जागा लढवणाऱ्या डाव्या पक्षांनी 18 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर 70 जागा लढणाऱ्या काँग्रेसला केवळ २० जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचा हा पराभवाच्या दिशेने होत असलेला प्रवास पाहता काँग्रेस नेत्यांचा संयम सुटत आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेत्या आणि काँग्रेसच्या तक्रार सेलच्या अध्यक्षा अर्चना दालमिया यांनी नागिरकांना लोभी असं म्हटलं आहे. कोरोना लसीच्या लोभापायीच नागरिकांना मतदान केल्याचं दिसून येतंय, असं ट्विट अर्चना यांनी केलं आहे.
बिहारी नागरिकांनो तुम्ही पुन्हा एकदा जुमलेबाजीत अडकला आहात, 15 लाख नाही तर कोविडची लस तरी टोचून घेऊयात. पण, मोफत लस मिळाली तर आम्हीही बिहारला येऊन लस टोचून घेऊ, असेही ट्विट अर्चना मालविया यांनी केलं आहे. दालमिया यांच्या ट्विटला अनेकांनी रिप्लाय देत त्यांच्यावर टीकाही केली आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 128 जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा 74, जेडीयू 48, हम 2 आणि व्हीआयपी 5 जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी 103 जागांवर आघाडीवर आहे.