गरीब उपवरांनाही लाभणार आयुष्याचा जोडीदार (भाग २)
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM
केवळ भौतिक सुविधाच पुरविण्यात येणार नसून जोडप्यांचे संसार चांगल्या पद्धतीने चालावेत यासाठी मैत्री परिवारातील ४० ज्येष्ठ कुटुंब प्रत्येकी एका जोडप्याला वर्षभर दत्तक घेऊन त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत की नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविणार आहेत. महाविवाह सोहळ्यात नववधूला मंगळसूत्र, जोडवी, लग्नाची खास साडी, चोळी, वराला कुर्ता पायजामा देण्यात येईल. विवाह विधीनंतर ४४ जोडप्यांची सामूहिक वरात बजाजनगर, शंकरनगर, लक्ष्मीभुवन चौक या मार्गाने रामनगर चौकातील राममंदिरात काढण्यात येईल. याप्रसंगी पत्रकार परिषदेला विष्णू मनोहर, प्रा. संजय भेंडे, प्रा. प्रमोद पेंडके, डॉ. पिनाक दंदे, निवृत्त पोलीस अधिकारी अनिल बोबडे, वास्तुरचनाकार संजय नखाते, केशव बावनकर उपस्थित होते.