शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

दक्षिण आणि पूर्व भारतात अतिवृष्टीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:00 AM

उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, तसा इशारा नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीने (एनडीएमएन) दिला आहे.

नवी दिल्ली   - उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असून, तसा इशारा नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीने (एनडीएमएन) दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत कोकण, गोवा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ व ओडिशासह दक्षिण भारतातील अनेक भागांत अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांत वादळी पावसामुळे उत्तर प्रदेशात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील पूर्वेकडचा काही भाग, बिहार व झारखंडमध्ये पुन्हा एकदा वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. कर्नाटक किनारपट्टी, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, केरळ, मिझोरम, त्रिपुरा, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार, झारखंड व छत्तीसगढ आदी राज्यांत दोन दिवसांत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. बंगालची खाडी, बांगलादेश व त्रिपुरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसIndiaभारत