शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा दोन दिवसात पावसाची शक्यता : पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला

By admin | Published: June 19, 2016 12:16 AM

जळगाव : गेल्यावर्षी दमदार पावसाअभावी सर्वांची निराशा झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा तब्बल ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावर्षी दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा बळीराजासह सर्वांना आहे. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

जळगाव : गेल्यावर्षी दमदार पावसाअभावी सर्वांची निराशा झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा तब्बल ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावर्षी दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा बळीराजासह सर्वांना आहे. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिमी
जळगाव जिल्‘ाचे सरासरी पर्जन्यमान हे ६६३.३ मिमी इतके आहे. तर एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ९९४९.४ इतके आहे. पाचोर्‍याचे पर्जन्यमान हे ७४३.४ मिमी तर जामनेरचे ७२१.५ इतके आहे. या तालुक्यात ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत या तालुक्यांमध्ये अनुक्रमे ४०८.९७ व ३९३.७७ इतका पाऊस झाला आहे.

कमी पावसामुळे १२९५ गावांना दुष्काळी फटका
सलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्याने जिल्‘ात भीषण टंचाई निर्माण झाली. जिल्‘ातील १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, भुसावळ ५४, यावल १०, रावेर १९, मुक्ताईनगर ८१, बोदवड ५१, पाचोरा १२८, चाळीसगाव १३६, भडगाव ६३, अमळनेर १५४, पारोळा ११४, चोपडा ८७ गावांना फटका बसला आहे. या वर्षभरात टँकरची संख्या ही ८० पर्यंत पोहचली होती.

यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा
सलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्यामुळे त्रस्त झालेल्या सर्वांना यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यावर्षी ७ जुनपासून पाऊस सुरु होईल अशी शक्यता हवामान विभागाने सुरुवातीला वर्तविली होती. मात्र १८ जुनपर्यंत पावसाचे आगमन लांबले आहे. हवामान विभागाने १९ जुनपासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. १९ रोजी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर २०, २१ व २२ या तीन दिवसात दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. २४, २५,२७ व २८ जून रोजी विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
जुलैमध्ये दमदार पावसाची शक्यता
जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा संपूर्ण आठवडा हा कमीअधीक प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार असल्याची शक्यता ॲक्युवेदर या हवामानविषयक वेबसाईटने वर्तविली आहे.