पोस्ट गावगिरी : वास्को
By admin | Published: May 05, 2015 1:22 AM
तुम्ही कसे आहात?
तुम्ही कसे आहात?मुरगाव तालुक्यातील काही नेत्यांना नागरिकांच्या आरोग्याची इतकी काळजी वाटू लागली आहे की काही नेते प्रभागात प्रत्येक रविवारी किंवा सुीदिवशी आरोग्य तपासणी शिबिर घेत आहेत. त्यासाठी काही हॉस्पिटलांतील डॉक्टरांची मदत घेतली जाते़ लोकही मोठ्या आशेने शिबिरात येतात. तेथे रक्ताची तपासणी करून मधुमेहाचे निदान केले जाते. रक्तदाबाचीही तपासणी केली जाते़ तपासणीनंतर डॉक्टरांकडून औषधोपचाराचा सल्ला दिला जातो़ शिबिरात औषधे दिली जातात; पण ती केवळ काही दिवसांसाठीच असतात़ औषधे संपल्यानंतर त्यांच्या आरोग्याचा पाठपुरावाही करावा अशी अपेक्षा ठेवावी का? नंतर या लोकांना डॉक्टरांकडून खासगीत पदरमोड करून तपासणी करावी लागते़ सध्या या शहरात अशा प्रकारच्या शिबिरांना ऊत आलेला आहे. शिबिरामागचा हेतू आणि आयोजक कोण याचा शोध घेतल्यास स्वार्थ लख्ख दिसतो. मुरगाव पालिकेच्या पाच महिन्यांनंतर निवडणुका आहेत. त्यासाठी इच्छुकांकडून शिबिर आयोजिले जाते. ज्या प्रभागातून निवडणूक लढविणार तेथील नागरिकांची मने जिंकण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाते. म्हणे मोफत! शिबिरात काही डॉक्टर स्वखुशीने (?) भाग घेतात. शिबिरात सल्ला दिल्यानंतर पुढील तपासणीसाठी रुग्ण आपल्याकडे येणार याची खात्री असेल की नाही? एकदा शिबिर संपल्यानंतर आयोजक या रुग्णांकडे पाठ फि रवितात, असो. खरे तर काही वर्षांपूर्वी वैद्य नामक संकल्पना होती. त्याला गावातील हरेक घरचा वैद्यकीय इतिहास माहीत असे. रुग्ण आजारी पडला की संबंधित घराच्या वैद्याला बैतं (धनधान्य) मिळत नसे. माणूस आजारीच पडू नये, याची तो काळजी घेई. कालांतराने शिक्षणाची गंगा वाहिली. परिणाम झाला तो फॅमिली डॉक्टर संकल्पना रुजण्यात. नंतर आधुनिकतेकडे वाटचाल करताना स्पेशलायझेशनचा जमाना आला. पैसा मोठा होत गेला. आता आजार आणि खर्च पाहता असे वाटते की आरोग्य व्यवस्थेचेच राष्ट्रीयकरण करायला पाहिजे. आजारी पडल्यावर उपचारांपेक्षा माणूस आजारीच कसा पडणार नाही, अशा व्यवस्थेचा आग्रह आपण धरला पाहिजे. पण लक्षात कोण घेतो? तात्पर्य काय, शिबिरे वगैरे झाली राजकीय मलमपी. यानिमित्ताने जनताजनार्दनाच्या आरोग्याची प्रचंड म्हणजे प्रचंडच काळजी घेणार्या आपल्या महान नेत्यांना सुहास्य मुद्रेने आपल्याला विचारता येते, तुम्ही कसे आहात?अनिल चोडणकर