नवी दिल्ली: टपाल तिकिटावर गुंड, माफियांचे फोटो छापले जाऊ शकतात का, या प्रश्नाचं आदर्श उत्तर नाही असंच देता येईल. पण व्यवस्थेत त्रुटी असल्यास काहीही होऊ शकतं. कानपूरमधील मुख्य टपाल कार्यालयात हेच घडलं आहे. कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयातून आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन आणि बागपत तुरुंगातील गँगवॉरमध्ये मारला गेलेला मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत. या तिकिटांच्या मदतीनं पत्र पाठवली जाऊ शकतात.भारतीय टपाल विभागानं 'माय स्टँप' योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले टपाल तिकिटं छापली आहेत. पाच रुपयाचं मूल्य असलेली छोटा राजनची १२, तर मुन्ना बजरंगीची १२ तिकिटं छापण्यात आली आहेत. टपाल विभागाला यासाठी ६०० रुपयांचं शुल्क मिळालं आहे. तिकिटं छापण्याआधी फोटोंची पडताळणी गरजेची होती. मात्र टपाल विभागानं कोणत्याही प्रकारची पडताळणी केली नाही.
काय सांगता? टपाल तिकिटावर छापला चक्क छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो
By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 1:52 PM