काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:28 PM2019-02-06T13:28:49+5:302019-02-06T13:30:23+5:30
काँग्रेससाठी येत्या निवडणुका या प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- काँग्रेससाठी येत्या निवडणुका या प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी आज अधिकृतरीत्या काँग्रेसचं महासचिवपद स्वीकारणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबरच वाड्रांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे एकत्रित छायाचित्र असल्यानं मोठा वाद झाला असून, काही तासांच्या आतच ते पोस्टर्स हटवण्यात आले आहेत.
खरं तर पोस्टरमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका यांच्याबरोबर रॉबर्ट वाड्राही दिसत होते. वाड्रा हे जमी घोटाळ्यात अडकले असून, ते न्यायालयाच्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. विरोधकांनी या प्रकारावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर लागलीच हे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. काँग्रेस मुख्यालयाबाहेर जवळपास 150 पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स आता हटवण्यात येत आहेत. या पोस्टर्समध्ये लिहिलं आहे की, कट्टर सोच नही, युवा जोश.
Delhi: Posters of Robert Vadra along with Priyanka Gandhi Vadra&Rahul Gandhi that were put up yesterday outside AICC headquarters, have been removed today. Jagdish Sharma,Congress says,"Modi govt is doing dirty politics, last night the posters were put up here now being removed." pic.twitter.com/hTAIVdSM3C
— ANI (@ANI) February 6, 2019
पोस्टर चुकीच्या जागी लावण्यात आल्यामुळे ते हटवत असल्याचं एनडीएमसीनं सांगितलं आहे. काँग्रेसची नवी महासचिव आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांना पार्टी मुख्यालयात एक केबिन देण्यात आलं आहे. प्रियंका भाऊ राहुल गांधी यांच्या बाजूच्या जुन्या केबिनमध्ये बसणार आहेत. राहुल गांधीही उपाध्यक्ष असेपर्यंत याच केबिनमध्ये बसत होते. प्रियंका यांच्याबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेल्या खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिग्विजय सिंह यांचं केबिन देण्यात आलं आहे.
Posters of Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra and Robert Vadra seen outside Congress party headquarters in Delhi pic.twitter.com/iI1ytpiGbD
— ANI (@ANI) February 5, 2019