शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:28 PM

काँग्रेससाठी येत्या निवडणुका या प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- काँग्रेससाठी येत्या निवडणुका या प्रभावशाली ठरण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी आज अधिकृतरीत्या काँग्रेसचं महासचिवपद स्वीकारणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबरच वाड्रांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचे एकत्रित छायाचित्र असल्यानं मोठा वाद झाला असून, काही तासांच्या आतच ते पोस्टर्स हटवण्यात आले आहेत.खरं तर पोस्टरमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका यांच्याबरोबर रॉबर्ट वाड्राही दिसत होते. वाड्रा हे जमी घोटाळ्यात अडकले असून, ते न्यायालयाच्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. विरोधकांनी या प्रकारावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर लागलीच हे पोस्टर्स हटवण्यात आले आहेत. काँग्रेस मुख्यालयाबाहेर जवळपास 150 पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स आता हटवण्यात येत आहेत. या पोस्टर्समध्ये लिहिलं आहे की, कट्टर सोच नही, युवा जोश.पोस्टर चुकीच्या जागी लावण्यात आल्यामुळे ते हटवत असल्याचं एनडीएमसीनं सांगितलं आहे. काँग्रेसची नवी महासचिव आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांना पार्टी मुख्यालयात एक केबिन देण्यात आलं आहे. प्रियंका भाऊ राहुल गांधी यांच्या बाजूच्या जुन्या केबिनमध्ये बसणार आहेत. राहुल गांधीही उपाध्यक्ष असेपर्यंत याच केबिनमध्ये बसत होते. प्रियंका यांच्याबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेल्या खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिग्विजय सिंह यांचं केबिन देण्यात आलं आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी