नवी दिल्ली : निलंबनाचा कोणताही फरक न पडलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारीही ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करताना फलक दाखवत जोरदार नारेबाजी केल्यामुळे लोकसभेतील वातावरण तापले. सरकारने सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी दर्शविली, मात्र विरोधकांचे त्यामुळे समाधान झाले नाही.अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला तेव्हा नारेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांसोबत डाव्या पक्षांच्या सदस्यांनीही हौदात धाव घेतली. समाजवादी पक्षासह राजद आणि जेडीयूचे सदस्यांनी जनगणनेची जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)
लोकसभेत पुन्हा पोस्टरयुद्ध
By admin | Published: August 12, 2015 1:47 AM